नवी दिल्ली – माजी मंत्री आणि भाजप आमदारानं एका टोल कर्मचा-याला मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून राजस्थानमधील बांसवाडा येथील भाजपचे आमदार जीतमल खांट यांनी ही मारहाण केली आहे. त्यांनी मारहाण केल्याची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. या व्हिडीओमध्ये जीतमल खांट हे टोल कर्मचा-याला मारहाण करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
#Banswada: Former State Minister & BJP MLA Jeetmal Khant (in Green) slaps and manhandles toll workers for collecting toll from his supporters. #Rajasthan pic.twitter.com/sw1rYXMhnf
— ANI (@ANI) March 17, 2018
दरम्यान जीतमल खांट हे बांसवाडा येथून जात असता एका टोलवर टोल कर्मचा-यानं त्यांना टोल भरण्यासाठी थांबवलं. या कर्मचा-यानं आपल्याला थांबवून टोल मागितल्यामुळे खांट यांनी या कर्मचा-याला मारहाण केली आहे. याबाबतचा व्हिडीओ एएनआयनं ट्वीट केला आहे. दरम्यान जीतमल खांट हे राजस्थानमधील बांसवाड़ा जिल्ह्यातील थाली तलाई या गावातील रहिवासी आहेत. यापूर्वी ते राजस्थान सरकारमध्ये राज्यमंत्रीही होती.
COMMENTS