काँग्रेसपुढे मोठ्या संघर्षाची वेळ – सोनिया गांधी

काँग्रेसपुढे मोठ्या संघर्षाची वेळ – सोनिया गांधी

नवी दिल्ली – काँग्रेस सध्या अन्यायाविरोधात आवाज उठवत असून काँग्रेसपुढे सध्या मोठ्या संघर्षाची वेळ असल्याचं वक्तव्य काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे. तसेच यावेळी बोलत असताना त्यांनी मोदी सरकारव जोरदार टीका केली आहे. हे सरकार मोठं ड्रामेबाज असून सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी लोकांना फक्त विकासाचं गाजर दाखवलं आहे. चार वर्ष होत असली तरी परिस्थिती जैसे थीच असून गेल्या चार वर्षांत त्यांनी काँग्रेसला संपवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सगळ्याचा वापर केला असल्याचा आरोपही यावेळी सोनिया गांधी यांनी केला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात त्या बोलत होत्या.

दरम्यान सत्तेच्या अहंकारापुढे काँग्रेस पक्ष कधी कोणापुढे झुकला नसून यापुढेही झुकणार नसल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच देशातील नागरिकांच्या मनात काँग्रेसबद्दल आजही प्रेम आहे, त्यामुळे त्यांच्या या प्रेमाच्या जोरावरच काँग्रेस पुन्हा उभारी घेणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे मी पुन्हा एकदा अभिनंद करते असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल यांनी अत्यंत आव्हानात्मक काळात अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असून व्यक्तिगत आशा-अपेक्षा, अहंकार दूर सारून सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असं आवाहनही सोनिया गांधींनी काँग्रेसमधील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.

COMMENTS