मुंबई – भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. गोपाळ शेट्टी यांना ख्रिश्चन धर्मीयांबाबत केलेल्या वक्त्तव्यानंतर पक्षश्रेष्ठींनी झापलं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाराज झालेले गोपाळ शेट्टी हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान भारतातील ख्रिश्चन हे मुळ ब्रिटीश होते. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नव्हता असं वक्तव्य गोपाळ शेट्टी यांनी केलं होतं. तसेच त्यांनी भारतातील हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र लढले. दोन्ही समुदायांनी मिळून भारत स्वतंत्र केला. स्वातंत्र्य लढ्यात हिंदू-मुस्लिम नव्हे तर हिंदूस्थानी म्हणून लढले असल्याचं शेट्टी यांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांना हे वक्तव्य भोवलं असून पक्षश्रेष्ठींनी दखल घेत त्यांना झापलं असल्याची चर्चा आहे.
दरम्यान मला कोणत्याही पदापेक्षा बोलण्याचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आणि प्रिय असल्याचं गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पक्षाने सांगण्याअगोदरच मी निर्णय जाहीर करणार असून पक्षाने कारवाई करण्याची वाट बघणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS