…त्यासाठी मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरेन –महादेव जानकर

…त्यासाठी मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरेन –महादेव जानकर

नागपूर – रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काल विधानपरिषदेचा अर्ज दाखल केला. त्यावेळी जानकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरले असल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता महादेव जानकर यांनी शिवसेना आणि भाजपची युती टिकवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरेन असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे जानकर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान शिवसेना आणि भाजपची युती कायम राहावी अशी आमची पहिल्यापासूनच भूमिका असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे. एकत्र राहण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना विनंती करु शकतो तसंच मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरु शकतो असं जानकर यांनी म्हटलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये  शिवसेना, भाजप, आरपीआय, शिवसंग्राम, रासप आणि शेतकरी संघटना यांची युती टिकवून ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी वेळ पडली तर मी त्यांचे पायही धरेन असं जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच माझा पक्षही छोटा आहे आणि माझ वय पण छोटं आहे त्यामुळे मी त्यांचे पायही धरु शकतो असं जानकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS