नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला असून माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे निलंबीत खासदार किर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसप्रवेशाबाबतची माहिती किर्ती आझाद यांनी ट्विट करत दिली होती.
दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांच्यावर किर्ती आझाद यांनी डीडीसीएमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजपाने किर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित केले होते. किर्ती आझाद बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. दरभंगा मतदारसंघातून त्यांनी सलग तीनदा विजय मिळवला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
आज सुबह कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @RahulGandhi जी ने मुझे कांग्रेस की सदस्यता ग्रहण कराई मैंने मिथिला की परंपरा में उनको मखाना की माला, पाग, चादर से सम्मानित किया।
Today in front of Shri Rahul Gandhi I joined the Congress I felicitated him in traditional Mithila style pic.twitter.com/B9DQwCM207— Kirti Azad (@KirtiAzadMP) February 18, 2019
COMMENTS