छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष विविध मुद्द्यांवरुन  एकमेकांवर  जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपाचे राष्टीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

या व्यंगचित्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक किल्ला दाखवण्यात आला असून यामध्ये मोदी अमित शाह यांना आपण छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून मागील निवडणुकीत मतं मागितली असं म्हणतायत. तर दुस-या बाजूला यावेळी काय करूयात? असा सवाल अमित शाह  यांनी मोदींना विचारला आहे.

COMMENTS