मुंबई – नाशिक ते मुंबईदरम्यान विविध मागण्यांसाठी हजारो शेतक-यांनी काढलेल्या मोर्चामागे माओवाद्यांचा हात असल्याचं वक्तव्य भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यांनी कष्टकऱ्यांची टिंगल केली असून माओवादी वगैरे विषय पुनम महाजन यांच्या बुद्धीपलकडचा आहे. त्यांना त्यातील काही समजणार नाही. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच नखांची निगा राखण्यासाठी पुनम महाजन जेवढा खर्च करतात. तेवढ्या पैशावर आमच्या आदिवासी महिला संसार चालवतात. नखांची निगा राखण्यासाठी पुनम महाजन ताजमध्ये जातात. त्यांनी या गोष्टीबद्दल बोलू नये असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
6 दिवसांपासून नाशिक ते मुंबई पायी चालत निघालेल्या 30-40 हजार शेतकऱ्यांच्या मोर्चाला खासदार महाजन यांनी नक्षल चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. ‘शेतकरी आंदोलनातून शहरी माओवाद डोकावत असून यामध्ये सर्व लोक हे लाल झेंडे घेऊन निघाले आहेत. असं पुनम महाजन यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुनम महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुनम महाजन यांना शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा अधिकार नाही. रक्ताळलेल्या शेतकऱ्यांचा त्यांनी अपमान केला आहे. यासाठी पुनम महाजन यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनीही पुनम महाजन यांच्यावर जोरदार टीका केली असून नखांची निगा राखण्यासाठी पुनम महाजन जेवढा खर्च करतात. तेवढ्या पैशावर आमच्या आदिवासी महिला संसार चालवतात. नखांची निगा राखण्यासाठी पुनम महाजन ताजमध्ये जातात. त्यांनी या गोष्टीबद्दल बोलू नये असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
COMMENTS