…तर नरेंद्र मोदींसाठी पुन्हा पंतप्रधान होणं अवघड  – भाजप खासदार

…तर नरेंद्र मोदींसाठी पुन्हा पंतप्रधान होणं अवघड – भाजप खासदार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला २३० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे अशक्य असल्याचं वक्तव्य भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच अशा परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी हे चांगला ‘पर्याय’ असू शकतात. ते मोदी यांच्याएवढेच चांगले आहेत.’ नेतृत्वात बदल केला तर ‘बसप’च्या मायावती ‘एनडीए’त आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असंही स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपला २२० किंवा २३० आणि ‘एनडीए’च्या घटक पक्षांना ३० अशा २५० जागा आम्हाला हमखास मिळतील. परंतु आणखी ३० जागांची आवश्यकता भासेल. तसेच घटक पक्षांनी मोदींना विरोध केला तर  आम्ही त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारू शकत नसल्याचंही स्वामी म्हणालेत.

COMMENTS