मुंबई – विधानसभा निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वानं शिवसेनेसमोर प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या शिवसेनेच्या घोषणेनंतर भाजपनं गंभीर दखल घेतली असल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने युती म्हणून एकत्रित लढवावी, असा दबाव भाजप नेतृत्त्वाकडून आणला जात असून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १४० पर्यंत जागा देण्याची तयारी भाजपनं दर्शवली असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान भाजपचा हा प्रस्ताव शिवसेना स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या खासदारासोबतही याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेले महाराष्ट्र हे राज्य भाजपसाठी अधिकच महत्त्वाचे आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार झालं असल्यामुळे भाजपनं शिवसेनेसोबत युती करण्याचं ठरवलं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे भाजपसोबत जातात की स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या घोषणेवर ठाम राहतात ये हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS