मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेतील हालचाली वाढल्या असल्याचं दिसत आहे. भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना आज भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. परंतु या भेटीबाबात अद्याप वेळ निश्चित झाली नसल्याची माहिती आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी वेळ दिला संध्याकाळी पाच वाजता ‘मातोश्री’वर या दोघांची भेट होणार असल्याचं बोललं जात आहे. कालच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपनं मुका घेतला तरी युती होणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या दोघांच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान नाणार प्रकल्पाला शिवसेनेनं जोरदार विरोध केला आहे. त्यातच वर्षभरावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेली सत्ताधाऱ्यांची कोंडी, युतीची चर्चा या पार्श्वभूमीवर या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बैठकीत नक्की काय चर्चा होणार आहे. हे बैठकीनंतरच समजणार आहे. तसेच याआधीच शिवसेनेनं भविष्यात भाजपशी कुठलीही युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे शिवसेना आपल्या युती करणार नाही यावर ठाम राहते की भाजप त्यांना निर्णय बदलायला लावते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या भेटीकडे आता दिल्लीचंही लक्ष लागलं आहे.
COMMENTS