दिल्ली – शिवसेनेनं काल आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपचे दिल्लीतील वरीष्ठ नेते चांगलेच संतापले आहेत. शिवसेना जर भाजपसोबत आगामी निवडणूक लढवणार नसेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे असा सल्ला भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर एकत्र नांदायचंचं नाही तर मग सत्तेतून शिवसेना बाहेर का पडत नाही असा सवाल भाजपच्या हायकमांडनं केला आहे. त्यावर आता शिवसेना काय भूमिका घेते ते पहावं लागेल.
शिवसेनेच्या या स्वबळाच्या नारा-यामुळे भाजपचे दिल्लीतील नेते संतप्त झाले आहेत. त्यांनी आताच सत्तेतून बाहेर पडावे असं त्यांनी शिवसेनेला सुनावल्याचं कळतंय. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर कदाचित पक्ष फुटेल अशी भाजपला आशा आहे. त्यामुळे शिवसेनाला घेरण्यासाठीच ही भाजपनं शिवसेनेवर दबाव वाढल्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र सबुरीनं घेत. शिवेसेनेनं काहीही निर्णय घेतला असला तरी ते सत्तेत आमच्यासोबत राहतील आणि सरकार संपूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS