मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने, प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.परंतु आज भाजप प्रदेशाध्यक्षपादाचा राजीनामा रावसाहेब दानवे यांनी दिल्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंगल प्रभात लोढा यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान राजीनामा दिल्यानंतर दानवे यांनी पत्रकार परिषद घेेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पक्षाची जबाबदारी अन्य कोणाकडे द्यावी, यासाठी पंतप्रधान मोदींना भेटलो, त्यांना विनंती केली त्यानंतर आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजपने १८ राज्य जिंकले. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी सरकार आणि पक्षाचा समन्वय साधला. भाजप महाराष्ट्रात पहिल्या क्रमाकांचा पक्ष आहे. २०१९ च्या निवडणूकीत पाचव्यांदा लोकसभेत निवडून आलो. एक व्यक्ती एक पद अशी तरतूद असल्यामुळे आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS