महायुती ‘एवढ्या’ जागा जिंकणार, भाजपचा सर्व्हे!

महायुती ‘एवढ्या’ जागा जिंकणार, भाजपचा सर्व्हे!

मुंबई – भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत एक सर्व्हे केला आहे. यामध्ये या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महायुती 229 जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या संख्याबळानुसार महायुती आणि अपक्ष मिळून 183 जागांचं बहुमत आहे. सर्व्हेच्या आकड्यांनुसार त्यात आणखी 40 ते 50 जागांची भर पडण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फक्त 50 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान भाजपनं केलेल्या या सर्व्हेमुळे शिवसेना-भाजपची युती होणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती लवकरच जाहीर होणार असल्याचं दिसत आहे. तसेच 13 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची ही घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS