विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपची खबरदारी !

विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपची खबरदारी !

लातूर –  लातूर-उस्मानाबाद आणि बीड विधानपरिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून खबरदारी घेतली जात असल्याचं दिसून येत आहे. लातूर महानगरपालिकेचे भाजपचे निवडून आलेले 36 आणि तीन स्वीकृत नगरसेवक असे 39 नगरसेवक रिसॉर्टला पाठवण्यात आले आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं ज्याप्रकारे आपले आमदार रिसॉर्टवर पाठवले होते. तोच फॉर्म्युला भाजपकडूनही वापरला जात असल्याचं दिसत आहे.

दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवकांचं प्रशिक्षण शिबीर ठेवलं असल्याचं सांगून त्यांना घेऊन जात आहेत. परंतु नगरसेवकांना मात्र कुठे जायचं तेच माहित नाही. पक्षाचा आदेश आला, आम्ही गाडीत बसणार, असं ते म्हणत आहेत. तसेच भाजपने लातूर महानगरपालिकेतील आपल्या 39 नगरसेवकांना थेट गोव्यात हलवलं असल्याची माहिती आहे. या नगरसेवकांसोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांची एका अलिशान हॉटेलात सोय करण्यात आली आहे. या सर्व नगरसेवकांना थेट 21 मे रोजी मतदान केंद्रावर आणलं जाणार आहे. त्यामुळे भाजपला या रणनितीत किती यश येणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS