विधान परिषदेसाठी भाजपनं “या” नेत्याला दिली उमेदवारी !

विधान परिषदेसाठी भाजपनं “या” नेत्याला दिली उमेदवारी !

मुंबई – विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या 7 जून रोजी मतदान होत आहे. त्यासाठी भाजपनं उमेदवार जाहीर केला आहे. सांगलीचे भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. पृथ्वीराज देशमुख हे दिवंगत पतंगराव कदम यांच्या घराण्याचे कट्टर विरोधक मानले जातात.

संख्याबळाचा विचार करता भाजपचा उमेदवार निवडूण येणं निश्चित आहे. सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये विरोधक उमेदवार देणार नाहीत अशी शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज देशमुख हे खासदार संजय काका पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक समजले जातात. काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांचा जाहीर वाद उफाळून आला होता. त्याच्या अनेक बातम्याही माध्यमातून आल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यांना शांत करण्यात भाजपा श्रेष्ठींना यश आलं होतं.

COMMENTS