लोकसभा निडणुकीचा फटका, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं दिला राजीनामा !

लोकसभा निडणुकीचा फटका, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं दिला राजीनामा !

मुंबई – लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवामुळे काँग्रेसमधील वातावण सध्या गरम आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस
अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. परंतु पक्षाच्या कोअर कमिटीने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्विकारत चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा स्विकारला जाणार का याकडे लक्ष लागलं आहे.

चव्हाण यांच्याबरोबरच उत्तर प्रदेशातली काँग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्विकारात राज बब्बर यांनीही राजीनामा दिला आहे. तर अमेठीत राहुल गांधी यांची जबाबदारी स्विकारून जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे लोकसभेत पराभव मळाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता राहुल गांधी पक्षातील नेत्यांना कसं बळ देणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS