भाजपचा शिवसेनेला अल्टिमेटम, युतीबाबत महिन्याभरात निर्णय घ्या !

भाजपचा शिवसेनेला अल्टिमेटम, युतीबाबत महिन्याभरात निर्णय घ्या !

नवी दिल्ली –  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये युतीसाठी भाजपने शिवसेनेला वारंवार आवाहन केलं मात्र सेनेकडून अजूनपर्यंत काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे जास्त वाट पाहायची नसल्याचं भाजपनं ठरवलं आहे. तसेच युतीबाबत एका महिन्यात निर्णय घ्या, असा  अल्टीमेटमही भाजपनं शिवसेनेला दिला असल्याची माहिती आहे.

लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त पाच महिने राहिले आहेत. तसेच आचारसंहिता दोन महिन्यात लागू होईल. त्यामुळं युतीबाबत महिन्याभरात निर्णय घ्या असा अल्टिमेटम भाजपने शिवसेनेला दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे युतीबाबत शिवसेना आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि सेनेत कटुता निर्माण झाली होती. अनेकवेळा शिवसेनेनं भाजपवर टीका केली. परंतु तरीही भाजप युतीबाबत शिवसेनेशी बोलणी करण्यास सकारात्मक असल्याचं दिसत आहे. विधानसभेत काही जास्त जागा देण्याची तयारीही भाजपने दाखवली आहे. जानेवारी महिन्यापर्यंतच वाट बघू नंतर स्वबळाची तयारी करू असं भाजपन ठरवलं आहे. त्यामुळे आता शिवसेना युतीबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS