भाजप महामेळाव्यातून परतताना कार्यकर्त्याचा मृत्यू !

भाजप महामेळाव्यातून परतताना कार्यकर्त्याचा मृत्यू !

नागपूर –  भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर आज भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.या महामेळाव्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला परंतु कार्यक्रमानंतर परत जाताना भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. भाजप महामेळाव्यातून परतीच्या मार्गावर जात असताना विशेष ट्रेनमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू  झाला असून नवनीत बेहरे असं या पदाधिका-याचं नाव आहे. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास डहाणू जवळ हृदयविकाराच्या झटक्याने बेहरे यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान या कार्यक्रमाला राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाजपचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्यासाठी भाजपने 28 विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती. या ट्रेन पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी आणि वांद्रे या स्थानकापर्यंत होत्या. यादरम्यान परत जात असताना भाजपच्या या पदाधिका-याचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS