पाटणा – भाजपमध्ये आक्षेपार्हय बोलणा-यांची काही कमी नाही. काही दिवसांपूर्वी पंडित नेहरु यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त ट्विट पक्षाच्या आयटी सेल प्रमुखांनी केले होते. त्यानंतर आता तेवढचे आक्षेपार्ह ट्विट बिहार भाजपचे अध्यक्ष नित्यानंद राय यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी हे गरीबीतून पुढे आले आहेत. ते स्वकर्तुत्वावर आणि कष्टाने पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कोणाचेही मतभेद असले तरी त्यांच्या गुणांची प्रत्येकाने कदर करायला हवी. जर कोणी त्यांच्याकडे बोट दाखवत असले तर त्यांचा हात कापू असा इशारा बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी दिला आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर राय यांना उपरती आली आहे. आपण म्हण म्हणून या वक्तव्याचा वापर केला होता. त्या वक्तव्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि ते वक्तव्य मागे घेतो असंही राय यांनी म्हटलं आहे.
Your own son rose out of poverty to become PM, regardless of differences everyone in the country should value it. If any hand or finger is raised against him (Modi), we should come together & break it & if need be even chop it off: Nityanand Rai, MP & Bihar BJP Chief (20.11.2017) pic.twitter.com/ILoXEEzMg0
— ANI (@ANI) November 21, 2017
Maine muhaware ke roop mein kaha tha. Main khed vyakt karta hun aur apne bayaan ko wapas leta hoon: Nityanand Rai, MP & Bihar BJP Chief on his statement that if any hand or finger is raised against PM Modi, we should break it. pic.twitter.com/LjK55L3hKc
— ANI (@ANI) November 21, 2017
COMMENTS