नवी दिल्ली – राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. राजस्थानमधील दौसा लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरीश मीना यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि सरचिटणीस अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. तसेच दुसरीकडे नागौर मतदारसंघातील भाजपाचे आमदार हबीब उर रहमान यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नसल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपला जोरदार धक्का असल्याचं बोललं जात आहे.
BJP MP from Rajasthan's Dausa Harish Meena has joined the Congress Party in the presence of party leaders Ashok Gehlot and Sachin Pilot, in Delhi pic.twitter.com/aiaePYmNnM
— ANI (@ANI) November 14, 2018
दरम्यान माझी काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. पूर्वी थोडा नाराज होतो, म्हणून पक्ष सोडला होता. आता नाराजी दूर झाली असून कोणत्याही अटींशिवाय मी काँग्रेसमध्ये सहभागी झालो आहे. तसेच देशातील मोठे नेते काँग्रेसबरोबर येत आहेत. भाजपा केवळ राम मंदिरबाबत बोलत आहे. भाजपात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचेच चालत असल्याचा आरोपही मीना यांनी यावेळी केला आहे.
COMMENTS