उमेदवारी नाकारल्यामुळे भाजप नेत्याला रडू कोसळले !

उमेदवारी नाकारल्यामुळे भाजप नेत्याला रडू कोसळले !

कर्नाटक – कर्नाटकमधील कलबुर्गी (गुलबर्गा) येथे उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपाचे नेते शशील नामोशी हे माध्यमासमोरच ढसाढसा रडले असल्याचं पहावयास मिळालं आहे. कलबुर्गीमधून उमेदवारी मिळेल या आशेवर ते होते. परंतु जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा नामोशींना मोठा धक्का बसला. पक्षाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नामोशींचे नाव वगळण्यात आले होते. हा धक्का नामोशींना सहन झाला नाही. त्यांनी माध्यम प्रतिनिधींना पत्रकार परिषदेसाठी बोलावले. आपलं म्हणणं माध्यमासमोर मांडत असताना नामोशींच्या भावना अनावर झाल्या आणि ते रडायला लागले.

दरम्यान यावेळी समर्थकांना नामोशींना आवरण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही आवरले नाहीत. त्यामुळे त्यांना अर्धवट पत्रकार परिषदही सोडून जावे लागले. मी अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत होतो. जेव्हा मला समजलं की यादीत माझं नाव नाही, तेव्हा मी अस्वस्थ झालो. असं का झालं, हे मला माहीत नाही. परंतु त्यामुळं मला खूप दु:ख झालं असल्याचं ते म्हणाले आहेत.

COMMENTS