स्मृती इराणींचा पाठलाग करणं पडलं महागात !

स्मृती इराणींचा पाठलाग करणं पडलं महागात !

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पाठलाग करणं चार जणांना महागात पडलं आहे. दिल्ली पोलिसांनी ४ युवकांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या या घटनेची माहिती स्वतः इराणी यांनी १०० नंबरवर फोन करुन पोलिसांना दिली होती. दिल्लीच्या चाणक्यपुरी परिसरात स्मृती इराणी यांच्या सरकारी गाडीचा पाठलाग केल्याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली होती. नंतर त्यांना जामीन मंजुर झाला होता. त्या चौघांविरोधात एप्रिल महिन्यात कलम ३५४ डी आणि कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या चार जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान स्मृती इराणी यांच्याकडे एकटक पाहायला सुरूवात केली तसंच त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर स्मृती इराणी यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांची तक्रार पोलिसांकडे केल्यावर लगेचच पोलीस घटनास्थळी पोहचले होते. पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढला होता परंतु पोलिसांनी पाठलाग करत त्यांना पकडलं. वैद्यकिय तपासणीनंतर ते चौघंही दारूच्या नशेत होते. चौघंही आरोपी दिल्ली विद्यापिठाच्या राम लाल आनंद कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

 

COMMENTS