काँग्रेसच्या ‘त्या’ सात आमदारांवर भाजपची नजर, विविध ऑफर दिल्याची माहिती !

काँग्रेसच्या ‘त्या’ सात आमदारांवर भाजपची नजर, विविध ऑफर दिल्याची माहिती !

बंगळुरुकर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-भाजपकडून निकराचे प्रयत्न सुरु आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला 8 जागा कमी पडत आहेत. त्यामुळे भाजपकडून अन्य पक्षाच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी भाजपकडून विविध ऑफर दिल्या जात असल्याचा दावा काँग्रेस आमदारांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने काँग्रेसच्या 7 लिंगायत आमदारांवर नजर ठेवली आहे. त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.

दरम्यान जेडीएस आणि कुमारस्वामींच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध करणारे हे आमदार असून त्यांना आपल्याकडे खेचून घेण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरु आहे. इतकंच नाही तर 5 असे आमदार आहेत जे जेडीएसमधून काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे ते आधीच जेडीएसवर नाराज आहेत. त्यामुळे जेडीएसशी आघाडी करण्याच्या काँग्रेसच्या फॉर्मुल्यावर ते नाखूश आहेत.  त्यामुळे नेमकी हीच संधी साधण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. काँग्रेसमधील लिंगायत 7 आणि जेडीएसमधून काँग्रेसमध्ये आलेले 5 अशा 12 आमदारांच्या संपर्कात भाजप असल्याची माहिती आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

भाजप 104

काँग्रेस 78

जनता दल (सेक्युलर) 37

बहुजन समाज पार्टी 1

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

अपक्ष 1

एकूण 222

 

COMMENTS