बीएमसीच्यावर झेंडा फडकवण्यासाठी ‘यांनी’ कसली कंबर

बीएमसीच्यावर झेंडा फडकवण्यासाठी ‘यांनी’ कसली कंबर

मुंबई : मुंबई महापालिकाची पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी ताकद लावण्यास सुरुवात केली. दुसरीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा देत मुंबईत पदयात्रा काढून मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर मराठी माणसासाठी लढणारी शिवसेना गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपने महिलांचे हळदीकुंकू समारंभ आयोजित करून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई महापालिकेत सध्या २२७ नगरसेवकांची संख्या आहे. यामध्ये शिवसेनेचे ९७, भाजपचे ८३, काँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ८, समाजवादीचे ६, एमआयएमचे २ व मनसे व अखिल भारतीय सेनेचा १ नगरसेवक आहे. मागील अनेक दशकांपासून शिवसेनेची बीएमसीवर सत्ता आहे. मागील निवडणुकीत भाजपने आव्हान दिले होते. यंदा तर दोन्ही पक्षांमध्ये मुख्य लढत होत आहे. यासाठी भाजपने मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा व प्रभारी म्हणून अतुल भातखळकर यांना जबाबदारी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी उद्योजक व व्यापारांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच महिला आकर्षित करण्यासाठी महिलांचा हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेऐवजी पालिकेतील संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्थानिक प्रश्नांवर मोर्चे काढणं, आंदोलन करणं आणि पदयात्रा आदी कार्यक्रम हाती घेतले आहेत. दुसरीकडे भाजपच्या गुजरातील व्होटबँकला सुरुंग लावण्याचं काम शिवसेनेने सुरू केला आहे. शिवसेनेने गुजराती मेळावे घेऊन भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. तसेच एमआयएमनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मुस्लिम मते आपल्या वळविण्यास सुरुवात केली आहे.

COMMENTS