महिला, उद्योग आणि शिक्षणासाठी विशेष तरतूद !

महिला, उद्योग आणि शिक्षणासाठी विशेष तरतूद !

मुंबई – अर्थसंकल्पामध्ये महिला उद्योग आणि शिक्षणासाठी खास तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असून व्यवसाय सुलभतेमुळे राज्यात प्रगती झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खासगी उद्योगास चालना मिळून निर्मिती क्षेत्रात वाढ होत असून वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एक नवा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सूत गिरण्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. तसेच फिन्टेक धोरणांतर्गत सामायिक सोयीसुविधांसाठी भांडवली सहाय्य देण्यात येणार आहे. तसेच विजेवर चालणारी वाहनं खरेदी कऱणाऱ्यांना सूट आणि निर्मिती कऱणाऱ्याला विशेष सहाय्य देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सूक्ष्म व लघु उद्योगांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष योजना तयार केली असल्याचं ते म्हणालेत.

महिला

महिला उद्योजकांकरता विशेष धोरण आखलं असून ज्यामुळे ९ टक्क्यावरुन २० टक्के वाढ अपेक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत.

शिक्षण

स्कील इंडिया – कुशल महाराष्ट्र योजना

राज्यातील १५ ते २५ वयोगटातील मुलांसाठी कौशल्य प्रदानाचा कार्यक्रम राबवला जातोय.

स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नविन कार्यक्रम

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी – परदेश रोजगार कौशल्य विकास केंद्र सुरु होतंय.

महाराष्ट्रात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना होणार

जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र – ५० कोटी

मानव विकास मिशनसाठी ३५० कोटी

आकांक्षित जिल्ह्यांना १२१ कोटी.

आंतरराष्ट्री दर्जाच्या १०० शाळा उभारणार, त्यासाठी नवीन मंडळ स्थापन होणार – ३६ लाख रुपयांची तरतूद

विद्यार्थ्यांचं विद्यावेतन ४००० रुपयापर्यंत वाढवलं

राजर्षी शाहू महाराज शिक्षणशुल्क योजना – मर्यादा ६ लाखावरुन ८ लाखापर्यंत वाढवले – 605 कोटी रू. निधी

अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी ४०० कोटींची तरतूद

महापुरुषांचे साहित्य सलग उपलब्ध व्हावे यासाठी वेबसाईटची निर्मिती – ४ कोटींची तरतूद

महानुभाव पंथाचे आद्याप्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या नावे अध्यासन केंद्र

अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या व वसतीगृहाच्या बांधकामाकरिता रू. 13 कोटी निधी.

COMMENTS