मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना नारळ देणार असल्याचे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील सध्याच्या जुन्या चेहऱ्यांना डच्चू जेऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचेही म्हटले. त्यामुळे या विस्तारात नारायण राणेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्या येत आहे. 31ऑक्टोबरला राज्यातील भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असून मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. नारायण राणे यांना नव्या एनडीएमध्ये सहभागी करून घेण्याची चिन्ह जास्त असून जुन्या काही मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बाकी राहीलेले सगळे प्रकल्प 2019च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पूर्ण होतील. आम्हाला प्रकल्प पूर्ण करायचे ध्येय गाठायला नक्की यश येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
COMMENTS