राहुल गांधी देशाचे नेतृत्त्व करण्यास सक्षम- संजय राऊत

राहुल गांधी देशाचे नेतृत्त्व करण्यास सक्षम- संजय राऊत

मुंबई – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात देशाचे नेतृत्त्व करण्याची पूर्ण क्षमता आहे तसेच ते ताकदीचे नेते म्हणून समोर येतील, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी ज्या प्रमाणे आक्रमक प्रचार करत आहेत ते पाहता शिवसेनेने त्यांचे कौतुक केल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

एका हिंदी वाहिनीच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी विचार मांडले. यावेळी त्यांनी मित्रपक्ष भाजपवर हल्लाबोल केला तर काँग्रेस व राहुल गांधींची स्तुती केली. राहुल गांधींना पप्पू म्हणणे चुकीचे आहे, असे स्पष्ट करतानाच देशातील जनता सर्वात मोठी ताकद असून, ती कोणालाही पप्पू बनवू शकते, असा अप्रत्यक्ष टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाणला.

खासदार संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत ते पाहता त्यांच्यात दम असल्याचे दिसून येते. एका राष्ट्रीय पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे. देशात आता नरेंद्र मोदींची लाट ओसरलेली आहे. लोक आता त्यांना विकासाबाबत विचारणा करत आहेत. हे सर्व गुजरातमधील वातावरणावरून दिसून येत आहे. मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीसारख्या निर्णयामुळे देशातील जनता नाराज आहे. त्यामुळे मोदींचा हवा आता संपल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

 

COMMENTS