मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत खालीलप्रमाणे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
- पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या कृषिपंपाच्या उर्जीकरणासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS) योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता.
- कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या आणि जुलै 2016 च्या निर्णयानुसार मुल्यांकनात पात्र ठरलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान.
- चित्रपट निर्मिती, टीव्ही मालिका, जाहिरातपट आणि माहितीपट इत्यादींच्या चित्रिकरणासाठी शासन स्तरावर आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना (Single Window Clearance System) लागू करण्याचा निर्णय.
- राष्ट्रीय महामार्गावरील नागरी क्षेत्रातील उड्डाणपूल, आरओबी, आरयुबी यांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होऊनही जमीन निधीअभावी रखडलेल्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातून निधी देण्याचा निर्णय.
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-160 चे कलम 166 (4) व कलम 73 कब (15) मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
COMMENTS