मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय !

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत खालीलप्रमाणे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

  1. पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या कृषिपंपाच्या उर्जीकरणासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS) योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता.

 

  1. कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या आणि जुलै 2016 च्या निर्णयानुसार मुल्यांकनात पात्र ठरलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान.

 

  1.  चित्रपट निर्मिती, टीव्ही मालिका, जाहिरातपट आणि माहितीपट इत्यादींच्या चित्रिकरणासाठी शासन स्तरावर आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना (Single Window Clearance System) लागू करण्याचा निर्णय.

 

  1. राष्ट्रीय महामार्गावरील नागरी क्षेत्रातील उड्डाणपूल, आरओबी, आरयुबी यांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होऊनही जमीन निधीअभावी रखडलेल्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातून निधी देण्याचा निर्णय.

 

  1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-160 चे कलम 166 (4) व कलम 73 कब (15) मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

 

COMMENTS