नवी दिल्ली – राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि खासदारांच्या पगारामध्ये केंद्र सरकारनं वाढ केली आहे. राष्ट्रपतींना ५ लाख, उपराष्ट्रपतींना ४ लाख तर राज्यपालांना ३.५ लाख पगार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खासदारांच्याही पगारात वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान यापुढे खासदारांच्या पगारांबाबत आता नवा कायदा करण्यात येणार आहे. सरकारी कर्मचा-यांप्रमाणे दर पाच वर्षांनी महागाईच्या दराप्रमाणे खासदारांचा पगार वाढवण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१८ पासून हा कायदा लागू होणार आहे. आत्तापर्यंत खासदार स्वत: संसदेत पगार ठरवत होते.परंतु यापुढे तसा ठरवता येणार नाही.
COMMENTS