मुंबई – राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहता केंद्र सरकारनं आणखी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ आणि केंद्र सरकारनं आणखी 2160 कोटी रूपये मदतीपोटी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून आतापर्यंत 4248.59 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. या मदतीमुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान राज्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी तर मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकय्रांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये 1284 छावण्या उभारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दुष्काळावर मात करण्यासाठी आणखी उपाययोजना राबवल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS