उद्धव ठाकरे – छगन भुजबळांची भेट, बराच वेळ रंगल्या गप्पा !

उद्धव ठाकरे – छगन भुजबळांची भेट, बराच वेळ रंगल्या गप्पा !

मुंबई – उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची मुंबईतील एका खासगी कार्यक्रमात भेट झाली आहे. या भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ गप्पा रंगल्या होत्या.पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या चिरंजीवांच्या लग्नसोहळ्याच्या स्वागत समारंभात या दोन नेत्यांची भेट झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत वरळी मेफेअर येथे हा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

दरम्यान जामीन मिळाल्यानंतर भुजबळ यांनी पाठिंबा दिल्या बद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार मानले होते. तसेच त्याबाबत पंकज भुजबळ यांच्यामार्फत ‘मातोश्री’वर मिठाई देखील पाठवण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एका कार्यक्रमात पहायला मिळाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

COMMENTS