मुंबई – आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ सर्विपक्षीय नेत्यांनी शनिवारी बैठक घेतली आहे. शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बड्या नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली आहे. तसेच भुजबळ यांच्या सुटकेसाठी भुजबळ समन्वय समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सदन आणि इतर गैरव्यवहाराप्रकरणी गेली २२ महिन्यांपासून छगन भुजबळ हे तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या समर्थकांनी देशभर आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या समर्थनार्थ राज्यात आंदोलन केलं जाणार असून या नव्या आंदोलनाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी आता सर्वपक्षीय नेते एकत्रित आले आहेत.
COMMENTS