राज्यात मनुवाद डोकं वर काढतोय – सुप्रिया सुळे

राज्यात मनुवाद डोकं वर काढतोय – सुप्रिया सुळे

बीड – महाराष्ट्रात मनुवाद डोकं वर काढतो आहे, तसेच मनुवादाविरुद्ध बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. बीड येथील 8 व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचं उद्घाटन शनिवारी पार पडलं. या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी मनुवादाविषयी मापलं मत मांडलं आहे. महाराष्ट्रात मनुवाद डोकं वर काढत असून त्याच्याविरुद्ध बोलणा-यांचा आवाज दाबला जात असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून मनुवादाबाबत साहित्यिकांनी आणि साहित्य समेलनामधून चर्चा व्हायला पाहिजे असंही  सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS