भुजबळ समर्थकांची उद्या देशभर निदर्शने, तीव्र आंदोलनाचा सरकारला इशारा !

भुजबळ समर्थकांची उद्या देशभर निदर्शने, तीव्र आंदोलनाचा सरकारला इशारा !

मुंबई – मागील २२ महिने कारागृहामध्ये असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवारी देशभर तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता निदर्शने केली जाणार आहेत. छगन भुजबळ आणि  माजी खासदार समीर भुजबळ यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीकडून चौकशीच्या नावाखाली नाहक कारागृहात डांबून ठेवले असल्याचा भुजबळ समर्थकांचा आरोप आहे. त्यांच्यावर न्यायालयामध्ये अद्यापही कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. मात्र गेल्या २२ महिन्यांपासून शासनाच्या चौकशी यंत्रणेने केवळ चौकशीच्या नावाखाली त्यांना कारागृहात डांबून ठेवले आहे. वास्तविक भुजबळांकडून न्यायालयीन चौकशीला संपूर्णपणे सहकार्य केले जात असतांना सरकारकडून मात्र सुडबुद्धीने कारवाई सुरु  असल्याचा आरोप भुजबळ समर्थकांकडून करण्यात येत आहे.

 

दरम्यान सरकारडून भूजबळांवर अन्याय केला जात असून आम्ही तो सहन करणार नाही असं भुजबळ समर्थकांचं म्हणणं आहे. जर भुजबळांना लवकरात लवकर कारागृहातून मुक्त केलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या भुजबळ समर्थकांनी दिला आहे.

COMMENTS