नंदुरबार, तळोदा, नवापूरच्या उपनगराध्यक्षपदांची निवड, ‘या’ उमेदवारांची उपनगराध्यक्षपदी वर्णी !

नंदुरबार, तळोदा, नवापूरच्या उपनगराध्यक्षपदांची निवड, ‘या’ उमेदवारांची उपनगराध्यक्षपदी वर्णी !

नंदुरबार – जिल्ह्यातील नंदुरबार, नवापुर आणि तळोदा या तीनही पालिकांच्या उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत सदस्यांच्या निवडी सोमवारी पार पडल्या आहेत. नंदुरबार नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदी काँग्रेस-सेना युती पुरस्कृत सेनेच्या शोभाताई मोरे यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपाच्या संगीता सोनवणे यांचा २७-११ अशा मतांनी पराभव केला आहे. तर काँग्रेस-सेनच्या कोट्यातुन तमीजोद्दीन काजी,रमेश सोनवणे,अर्जुन मराठे यांची तर भाजपाच्या कोट्यातुन निलेश माळी यांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागली आहे. नवापूर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अय्युब बलेसरीया यांची तर स्वीकृतपदी बंटी चंदलाणी, यश अग्रवाल यांची निवड झाली आहे. तर तळोदा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या भाग्यश्री चौधरी यांची तर स्वीकृतपदी भाजपाच्या हेमलाल मगरे आणि काँग्रेसच्या जीतेंद्र सुर्यवंशी यांची निवड झाली आहे.

दरम्यान आठरा तारखेला निकाल लागलेल्या नंदुरबार, नवापूर पालिकेत काँग्रेसचे तर तळोदा पालीकेत भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले आहेत. आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

COMMENTS