गावातील ‘त्या’ सालापर्यंतची अतिक्रमणे नियमित होणार !

गावातील ‘त्या’ सालापर्यंतची अतिक्रमणे नियमित होणार !

नागपूर – शहरांप्रमाणे राज्यातील अनेक गावांमध्येही अतिक्रमणांचा विळखा पहावयास मिळत आहे. हा विळखा रोखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेद्वारे केला जात आहे. परंतु ज्यांनी ज्यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील जागेवर अतिक्रमण केलं आहे त्यातील काही जणांना सरकारनं दिलासा दिला आहे. 2000 सालापर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार असल्याची घोषणा सरकारनं केली आहे. याबाबतची माहिती विधानसभेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

राज्य सरकारनं केलेल्या या घोषणेमुळे 2000 सालापर्यतच्या ५०० चौरस फूटापर्यंतचीच बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या अतिक्रमण धारकांना दिलासा मिळाला आहे. तसेच २००० नंतर आणि २०११ पर्यंतची अनधिकृत बांधकामे निम्मा रेडी रेकनर घेऊन नियमित करणार असल्याचा विचार सुरु असून राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS