शेतक-यांवर गुन्हे दाखल होतील असं राजू शेट्टींनी वागू नये – चंद्रकांत पाटील

शेतक-यांवर गुन्हे दाखल होतील असं राजू शेट्टींनी वागू नये – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खासदार राजू शेट्टी यांना इशारा दिला आहे. गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांवर साधी काटी उगारली नाही. तरीही राजू शेट्टी म्हणतात आम्ही काही केलं नाही.

उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु व्हावेत अशी माजी इच्छा आहे. तसेच ऱाजू शेट्टी यांनी शेतक-यांवर गुन्हे दाखल होतील असं वागू नये असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिलीच पाहिजे. जर अडचण असेल तर राज्य सरकार त्यांना मदत करण्याचा तयारीत आहे. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर; प्रशासन गप्प बसणार नाही असंही चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोकसभा आणि विधानसभा जागा वाटपाचा फार्मुला आत्ताच निश्चित व्हावा अशी शिवसेनेची इच्छा असल्याचंही चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच उस्मानाबाद आणि औरंगाबाद या शहराचे नाव बदलावे अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. यावरही बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही भाजपचीच इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

तसेच यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी राज ठाकरे यांना आवाहन केलं आहे. राज्यातील विकासकामांबाबत राज ठाकरे नेहमी टीका करतात. यासाठी महाराष्ट्रात दोघेही एकत्र फिरु आणि महाराष्ट्रात कामे झालीत की नाही हे तपासू असं चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS