चंद्रकांत पाटील चांगला माणूस, कमी हादरा बसणाऱ्या खड्ड्याला त्यांचं नाव द्या – बाळासाहेब थोरात

चंद्रकांत पाटील चांगला माणूस, कमी हादरा बसणाऱ्या खड्ड्याला त्यांचं नाव द्या – बाळासाहेब थोरात

मुंबई –  मराठवाड्यात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्या आम्ही जालना येथे होतो.  तिथल्या राज्यकर्त्यांनी खड्ड्यांना मंत्र्यांची नावे दिली, मी म्हटलं चंद्रकांतदादा पाटलांचं नाव जरा चांगल्या कमी हादरे देणाऱ्या खड्ड्यांना द्या कारण ते चांगले माणूस आहेत असं वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात बेरोजगारी मोठ्याप्रमाणात वाढतेय, मॅग्नेटिक महाराष्ट्रानंतर किती रोजगार निर्माण झाले?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजप सरकारनं फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला असून राज्यातील जनतेची घोर निराशा झाली असल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

COMMENTS