मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय नेते लागले आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांनी काल यापुढे कोणतीच निवडणूक लढणार नसल्याबाबत वक्तव्य केलं होतं. परंतु या वक्तव्यावरुन त्यांनी आज पलटी घेतली असल्याच दिसत आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असून राजकीय संन्यास घेणार नसल्याचा खुलासा पाटील यांनी केला आहे.
दरम्यान निवडणूक लढवायची नाही हे वाक्य वेगळ्या संदर्भानं आलं होतं. मात्र त्याचा विपरीत अर्थ काढण्यात आला असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. ‘कोल्हापुरात गेल्यावर्षी चंद्रकांत पाटील यांनी डॉल्बीच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे कोल्हापुरात डॉल्बी लागला नव्हता. यावरुन मंडळांमध्ये नाराजी आहे. परंतु डॉल्बीला विरोध हा काही माझा पर्सनल अजेंडा नव्हता. त्या मुद्द्यावर मला काही निवडणूक लढवायची नाही. माझी काही सामाजिक भूमिका आहे, त्यामुळेच मी विरोध केला असल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
COMMENTS