त्रुटी असतील तर धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देणार – बावनकुळे

त्रुटी असतील तर धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देणार – बावनकुळे

नागपूर – धर्मा पाटील यांच्या १९९ हेक्टर जागेचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. जर काही त्रुटी असतील त्याचा मोबदला व्याजासह दिला जाईल असं वक्तव्य ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसेच प्रति हेक्टर १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देता येईल का याबाबत सरकार विचार करत असल्याचंही ते म्हणाले आहेत. या प्रकरणात मी स्वत: लक्ष घातले असून धर्मा पाटील यांच्या मुलाशी फोनवरुन चर्चा केली असल्याचं ते म्हणाले आहेत. धर्मा पाटील यांच्यावर सरकार अन्याय करणार नाही असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलं आहे.

जुलै २००९ मध्ये प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आणि मार्च २०१५ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. या निवाड्याविरोधात धर्मा पाटील यांनी कलम १८ अंतर्गत कोर्टात जाणे अपेक्षित असते. भूसंपादनात कमी भाव मिळाला असेल, झाडांचे मूल्यांकन कमी झाले असेल कोर्टात दाद मागावी लागते. परंतु धर्मा पाटील यांनी सुरुवातीला मोबदला स्वीकारल्यानंतर त्यांनी जागेला कमी भाव मिळाला अशी तक्रार केली असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS