चंदूकाका जगताप यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड – खा. अशोक चव्हाण

चंदूकाका जगताप यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड – खा. अशोक चव्हाण

मुंबई – पुरंदरचे माजी आमदार चंदू काका जगताप यांच्या निधनाने एक समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केलं आहे. अत्यंत गरीबीतून व कष्टातून चंदूकाका जगताप यांनी प्रगती केली. ते आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ होते असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान १२ वर्ष सासवडचे नगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक, विधान परीषदेचे आमदार, राज्य सहकार परीषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. संत सोपानकाका सहकारी बँक, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था, पुरंदर मिल्क कंपनीची स्थापना करून त्यांनी सहकारक्षेत्रात भरीव कार्य केले. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्थाची उभारणी करून ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली.चंदू काका जगताप यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS