व्हीआयपी मोबाईल नंबर घेणं माजी मंत्र्याला पडलं महागात, दीड लाखाचा गंडा !

व्हीआयपी मोबाईल नंबर घेणं माजी मंत्र्याला पडलं महागात, दीड लाखाचा गंडा !

नाशिक – आजकाल गाडीचा आणि मोबाईलचा व्हीआयपी नंबर घेण्याचं अनेकांना फॅड लागलेलं असतं. याला अपवाद माजी मंत्रीही ठरले नाहीत. कारण त्यांनीही मोबाईलचा व्हीआयपी नंबर घेण्यासाठी धडपड केली परंतु ही धडपड त्यांना महागात पडली असून व्हीआयपी मोबाईल नंबर देतो म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप यांना 1 लाख 40 हजारांचा गंडा एका इसमानं घातला आहे. झालं असं की घोलप यांना एका इसमानं फोन करुन तुम्हाला व्हीआयपी नंबर देतो असं म्हटलं. त्यानंतर त्यानं घोलप यांच्याकडून या व्हीआयपी नंबरसाठी 1 लाख 40 हजारांची रक्कम घेतली आणि तो पसार झाला.

दरम्यान पैसे देऊनही घोलप यांना तो व्हीआयपी नंबर मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचं कळताच घोलप यांनी  नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत असून दिवशेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे अनोळखी व्यक्तींना पैसे देवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

COMMENTS