नाशिक – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांसह त्यांच्या कुटुंबीयांना आणखी एक दणका बसला असून नाशिक मर्चंट बँकेने आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जप्तीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भुजबळ यांच्या मालमत्तेचा मुद्दा चर्चेत आला आहे. नामको बँकेकडून आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 4 कोटी 34 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते विहित मुदतीत न फेडल्याने, बँकेने नोटीस पाठवूनही 60 दिवसात कर्जफेड केली नसल्याने कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे.
दरम्यान यापुढेही कंपनीने कर्जभरण्यास चालढकल केली, तर पुढची कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. तसचे याबाबत स्थानिक वृत्तपत्रातही नोटीस प्रसिद्ध केली असून कंपनीबरोबर कुठल्याही स्वरूपाचा करार करू नये असं बँकेनं म्हटलं आहे. माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ हे या कंपनीचे संचालक आहेत.
COMMENTS