आश्वासन देणं आणि कायदा करणं स्वतंत्र गोष्टी, भुजबळांचा टोला

आश्वासन देणं आणि कायदा करणं स्वतंत्र गोष्टी, भुजबळांचा टोला

नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत हमीभाव होता आणि राहील हे सांगितलं याचं स्वागत आहे. शेतकऱ्यांना तेच हवंय मात्र,आश्वासन देणं आणी कायदा करणं या स्वतंत्र गोष्टी आहेत. केंद्र सरकारनं कृषी कायदे रद्द करून नवा कायदा करावा, असं भुजबळ म्हणाले. केंद्र सरकारनं त्यापूर्वी सर्व राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांसोबत चर्चा करावी, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राज्यसभेत बोलतान मोदी म्हणाले, आम्ही, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकरी आंदोलकांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा सुरु आहेत. मिळून मिसळून चर्चा करु, वृद्ध शेतकऱ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये. असं मोदी म्हणाले. आज मी संसदेतूनही आवाहन करतो, चर्चेने मार्ग काढू, तुम्हाला लोकशाहीत आंदोलनाचा हक्क आहे, आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं आहे, मागे नाही. पक्ष-विपक्ष असो, या सुधारणांना आपण संधी द्यायला हवी, या परिवर्तनाने लाभ होतो की नाही हे पाहावं लागेल, काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा करु, आपण काही दरवाजे बंद करत नाहीत. मंडई अधिक प्रतिस्पर्धी होतील, लाभ होईल, MSP होता, आहे आणि राहील. या सभागृहाच्या पवित्र्यातून आम्ही ही ग्वाही देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

COMMENTS