समीर भुजबळ बाहेर येताच छगन भुजबळांनी दिली ‘ही’ गर्जना !

समीर भुजबळ बाहेर येताच छगन भुजबळांनी दिली ‘ही’ गर्जना !

मुंबई –  महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तरुंगात असलेल्या समीर भूजबळ यांची काळ जामीनावर सुटका झाली आहे.समीर भुजबळ हे 27 महिने तुरुंगात होते. छगन भुजबळांनंतर त्यांचीही सुटका करण्यात आली असून माजी खासदार समीर भुजबळ तुरुंगाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर समीर भुजबळांनी निवासस्थानी जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी बचेंगे तो और भी लड़ेंगे, अशी गर्जना छगन भुजबळ यांनी दिली असल्याची माहिती आहे. भुजबळांच्या या गर्जनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान मनी लॉन्डरिंग अॅक्ट प्रकरणात कमाल सात वर्षांची शिक्षा आहे. त्यापैकी समीर भुजबळ यांनी एक तृतीयांश कालावधी तरुंगात काढला आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने विशिष्ट मुद्द्यांवर 4 मे रोजी जामीन मंजूर केला होता. त्याच आधारे समीर यांना जामीन मंजूर केला असून  समीर यांनी महाराष्ट्र आणि गोव्याबाहेर जाऊ नये, अशी अटही न्यायालयाने घातली असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS