औरंगाबाद – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्यात येणार नसल्याची शक्यता मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांनी आज औरंगाबादमध्ये वर्तवली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडक संपादकांशी चर्चा करताना ते बोलत होते. देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी कायदेमंडळाने ठरवले पाहिजे. तसेच यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल. तसेच लोकप्रतिनिधी कायद्यामध्येही सुधारणा करावी लागणार आहे. या प्रक्रियेला किमान वर्षभराचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आगामी लोकसबा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेतली जाण्याची शक्यता नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यासाठी देशातील विधानसभांचा कार्यकाळ संपण्याची प्रतीक्षा निवडणूक विभाग करु शकत नसल्याचही रावत यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यघटनेच्या नियम ३२४ नुसार निवडणूक प्रक्रिया राबविणे ही मुख्य निवडणूक आयुक्तांची महत्त्वाची भूमिका असते असंही रावत यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे रावत यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होणार नसल्याचं दिसत आहे.
COMMENTS