अन् मुख्यमंत्री कार्यक्रमात म्हणाले लव्ह यू…

अन् मुख्यमंत्री कार्यक्रमात म्हणाले लव्ह यू…

नवी दिल्ली – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पुन्हा एका व्हिडिओमुळे  लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओत शिवराजसिंह यांच्याभोवती लोकांची गर्दी जमली आहे. काही लोक त्यांना चिठ्ठ्या देत आहेत. या गर्दीतील एक व्यक्ती शिवराज यांना मामाजी असा आवाज देत आहे. शिवराज यांनी पाहिल्यानंतर ती व्यक्ती त्यांना आय लव्ह यू म्हणते. त्यावर शिवराजही लव्ह यू म्हणतात आणि फ्लाइंग किस देतात. त्यानंतर ते खळखळून हसायला लागले. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा हा व्हिडिओ एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील अशोक नगरमधील मुंगावली या गावातील एका कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

COMMENTS