‘मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचे टायर बदला’, राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर निशाणा

‘मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचे टायर बदला’, राज ठाकरेंची व्यंगचित्रातून सरकारवर निशाणा

गेल्या चार दिवसांपासून संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला. शुक्रवारी रात्री उशिरा कोअर कमिटीची बैठक झाली आणि संप मागे घेत असल्याचे या समितीने जाहीर केले. या एसटी संपाबाबद राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

या व्यंगचित्रात एसटी कर्मचाऱी मुंख्यमत्र्यांना आपल्या मागण्या मांडत फक्त एसटीचे दोन टायर बदला म्हणजे आमच्या मागण्या फुगलेल्या वाटणार नाहीत, असे म्हटले गेले, या टायरवर ‘मंत्री- आधिका-यांचा भ्रष्टाचार’ असे लिहण्यात आले आहे. टायरमुळे टायर्ड असे या व्यंगचित्राला शिर्षक देण्यात आले आहे. संप मागे घेतला तरी वस्तूस्थिती तीच राहणार अशी टीप टाकली आहे.

COMMENTS