“ …तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा काढणार !”

“ …तर भर पावसात चंद्रकांत पाटलांच्या घरावर मोर्चा काढणार !”

कोल्हापूर चिकोत्रा खोऱ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. याबाबत मंगळवारी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. चिकोत्रा खोऱ्यातील वरदाई असलेल्या झुलपेवाडी -चिकोत्रा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे, चिकोत्रा खोऱ्यातील 32 गावामध्ये पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक बनले आहेत.विविध आंदोलनं करुनही मागण्या मान्य होत नसल्यामुळे 1 जुलै रोजी महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर, शेतकऱ्यांच्या मुलांची धरणस्थळापासून  उभ्या पावसात भिजत मोटारसायकल रॅली काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान गेल्या 20 वर्षांपासून इथे पाणीप्रश्न भेडसावत असून चुकीच्या सर्वेक्षणाने चिकोत्रा नदीवर धरण बांधल्याने, हे धरण भरतच नाही, त्यामुळे धरणक्षेत्रातील 32 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणासाठी चुकीचा सर्व्हे झाल्याने अधिकाऱ्यांनी सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली. मात्र त्या चुका सुधारण्यासाठी आम्ही उपाय सुचवले असल्याचं या आंदोलकांनी म्हटलं आहे.

आंदोलकांच्या मागण्या

 चिकोत्रा धरणाची गळती ताबडतोब काढण्याची

हिरण्यकेशी नदीकडे जाणारे अतिरिक्त पाणी कॅनॉल मधून चिकोत्रा धरणात वळवण्याची मागणी

पुनर्वसनासह दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी

चिकोत्रा धरणाचे जलस्तोत्र बळकटीकरण करण्यासाठी लागणाऱ्या निधीचे जिल्हा नियोजन मंडळातून ताबडतोब तरतूद करण्याची मागणी

हेळ्याचा देव येथून वाया जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वळवण्याची मागणी

आरळगुंडी येथून जाणारे ओघळाचे पाणी चिकोत्रा धरणात वळवण्याची मागणी

भावेश्वरी मंदिर (दिंडेवाडी) परिसरामधून जाणारे पाणी  चिकोत्रा धरणात वळवण्याची मागणी

म्हातारीचे पठार व शिवारबा पठार येथून जाणारे पाणी चिकोत्रा धरणात वळवण्याची मागणी

COMMENTS